लोकपत न्यूज नेटवर्क / नवी दिल्ली
देशाची राजधानी नवीदिल्लीतल्या द्वारका ग्रेटर नोएडा आणि प्रगती मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा ऑटो एक्सपो अर्थात वाहनांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलंय. भारताच्या ऑटो इंडस्ट्रीत मागच्या काही वर्षांमध्ये बारा टक्के वाढ झाली 25 कोटी लोक गरीबीच्या बाहेर निघाले आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी या ऑटो प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केलंय.
या प्रदर्शनात कमर्शियल व्हेईकल आणि पॅसेंजर व्हेईकल अशा दोन प्रकारची वाहनं पाहायला मिळणार आहेत. ‘टू व्हीलर सेगामेंट’मध्ये हिरो मोटो कॉर्प आणि सुझुकी इंडिया, हुंडाई इंडिया मोटर, टाटा मोटर्स, किया इंडिया, जेएसडब्ल्यू, इंडिया मोटर्स, स्कोडा आधी कंपन्या स्वतःची वाहनं या प्रदर्शनामध्ये ठेवणार आहे.
लक्झरी कार तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये मर्सिडीज बेंज इंडिया, बीएमडब्ल्यू इंडिया, पोर्श इंडिया या कंपनीत सुद्धा आपापली उत्पादनं या प्रदर्शनात ठेवणार आहेत. या प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिक वाहनंसुध्दा ठेवली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खास तुमच्या माहितीकरता सांगत आहोत, केंद्र सरकारनं 2030 पर्यंत पॅसेंजर व्हेईकल सेक्टरमध्ये 30 टक्के विद्युतीकरणाच्या ‘टार्गेट’ ठेवलं आहे. या प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिक कार्सदेखील पाहायला मिळणार आहेत. तर मग विचार कसला करताय, पटकन निर्णय घ्या आणि या प्रदर्शनाला भेट द्या.