लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
बांगलादेशात हिंदूंवर वाढत्या अत्याचारांना विरोध करणारे हिंदू पुजारी आणि इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण प्रभू यांना बांगलादेशाच्या ढाका इथं स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात भारत सरकारनं पुढाकार घ्यावा, अशी विनंती इस्कॉनचे प्रवक्ते राधा रमण प्रभू यांनी केली आहे.
ढाका शहराच्या उत्तरेला असलेल्या रंगपूर शहरात हिंदू समुदायाच्या नेतृत्वाखाली मजबूत संरक्षण आणि अल्पसंख्यांकांना समर्पित असलेल्या मंत्रालयाच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात येत होती. त्या निदर्शनामध्ये चिन्मय कृष्ण प्रभू सहभागी झाले होते. मात्र दहशतवादी समजून स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक केली.
दरम्यान, चिन्मय कृष्णप्रभू यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी बांगलादेशात हिंदू मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. हिंदू साधू आणि बांगलादेशी अल्पसंख्यांकांचा चेहरा असलेले चिन्मय कृष्ण प्रभू यांना स्थानिक पोलिसांनी अटक करत अज्ञातस्थळी नेलं आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना एक पोस्ट टॅग करत इस्कॉनचे प्रवक्ते राधा रमण प्रभू यांनी या संदर्भात भारत सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली आहे.