लोकपत डिजिटल न्यूज / अहिल्यानगर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य, त्यांच्या या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी, संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे, या क्रांतिकारी लढ्यात प्राणाची आहुती देणारे छत्रपती शिवरायांचे अनेक शूरवीर मावळे आहेत. या मावळ्यांपैकी एक नाव सध्या गाजतं आहे. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी राजांबरोबर लढाईमध्ये भाग घेणारे येसाजी कंक हे व्यक्तिमत्व दाखवण्यात आलं आहे.
येसाजी कंक कुठले आहेत, हे अद्यापही अनेकांना माहित नाही. लोकपत डिजिटल न्यूज अँड लोकपत यूट्यूब चॅनलनं येसाजी कंक यांच्या वंशजांशी आम्ही आज (दि. २२) गप्पा मारल्या. येसाजी कंक यांना चार भाऊ होते. त्यापैकी दोघे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात असलेल्या करजगाव इथं आले. आजही पडझड झालेला कंकांचा वाडा याठिकाणी आहे. येसाजी कंकांचे वंशज पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या राजगडाच्या पायथ्याला जे भुतोंडे गाव आहे, त्या गावात आजही आहेत.
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या येसाजी कंक यांच्या वंशजांशी आपण (लोकपत डिजिटल न्यूज अँड लोकपत यूट्यूब चॅनल, अहिल्यानगर) लवकरच गप्पा मारणार आहोत. तूर्तास अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात असलेल्या करजगावच्या येसाजी कंक यांच्या वंशजांशी आम्ही मारलेल्या गप्पांचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा.