लोकपत न्यूज नेटवर्क / पुणे
गुईलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्मिळ आजारानं ठिकठिकाणी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे हा आजार बळावत असल्याचे सांगितले जात आहे. या आजाराचे 205 रुग्ण एकट्या पुणे विभागात आढळून आले आहेत. यातले निम्मे रुग्ण पुण्याच्या सिंहगड परिसरात आढळून आले आहेत. राज्याच्या तुलनेत जीबीएस चे सर्वात जास्त रुग्ण पुण्याच्या सिंहगड या भागात असल्याचे सांगितलं जात आहे.
सिंहगड परिसरात आढळून आलेल्या या रुग्णांमध्ये प्रामुख्याने कॅम्पायलोबॅक्टर, जेजुनी आणि गुरु व्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. हाच संसर्ग जीबीएसच्या उद्रेकाचं कारण सांगितलं जात आहे. सिंहगड परिसरात आढळून आलेले 90 रुग्ण हे नांदेड गावातल्या विहिरी आणि खडकवासला धरणातल्या पाण्याची स्रोत वापरणारे आहेत.
या परिसरातल्या पाण्याच्या विविध स्ततांची तपासणी करण्यात आली. 40 नद्यांपैकी आठ नमुन्यांमध्ये कोलीफॉर्म, 25 नमुन्यांमध्ये ईकोलाय, सहा नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस आणि एका नमुन्यामध्ये कॅम्पायलोबॅक्टर, जेजुनी आढळून आला आहे. आता सिंहगड रस्ता परिसरातल्या जीबीएस रुग्णसंख्येविषयी थोडक्यात माहिती जाणून घ्या.
नांदेड (गाव फाटा सिटी) 30 रुग्ण
किरकटवाडी 28 रुग्ण.
धायरी 17 रुग्ण.
सिंहगड रस्ता (माणिक बाग, दांडेकर पूल, वडगाव, हिंगणे) 15 रुग्ण.
खडकवासला, कोल्हेवाडी 12 रुग्ण.
आंबेगाव 4 रुग्ण. असे एकूण जीबीएस चे 106 रुग्ण पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरात आढळून आले आहेत. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.