लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी दिनांक 1 रुपये एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर (एच.एस.आर.) लावण्यात येणार आहे, अशी माहिती अहिल्यानगरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाहनांना नंबर प्लेट बसविण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एफटीए एच एस आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. नंबर प्लेट बुकिंगसाठी Maharashtrahsrp.com हे संकेतस्थळ (वेबसाईट) असणार असून अधिकृत ट्रीटमेंट सेंटरची यादी transport. Maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित केली जाणार आहे.
दरम्यान, दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये, प्रवासी चार चाकी ट्रक, ट्रेलर्स आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. सर्व वाहनधारकांनी 31 मार्चअखेर अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जुन्या वाहनांना एच एस आर पी बसवण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे
यांनी केलं आहे.