लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईचे भूमिपुत्र जेष्ठ साहित्यिक, माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त सोनईतल्या त्यांच्या रानमळ्यात आज (दि. 12 ) संत महंतांच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
माजी खासदार गडाख यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी
नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातून
विविध राजकीय पक्षांचे, संस्थांचे पदाधिकारी,
साहित्यिक, कार्यकर्ते, शेतकरी, संत महंत, विधिज्ञ, पत्रकार यांची
मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सकाळी 9 ते दुपारी 1.30
वाजेपर्यंत अभिष्टचिंतनासाठी मोठी गर्दी झाली
होती.
उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्विकार माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केला. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, ‘सामाजिक जीवनात
सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी
मानून काम केलं. रचनात्मक कामाचा ध्यास घेऊन जनतेसाठी विधायक काम करता आलं, याचा मनाला अभिमान आहे.
82 व्या वाढदिवसानिमित्त
शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य शेतमजुरांपासून, संत महंत, पदाधिकारी उपस्थित राहिले,
याबद्दल त्यांनी उपस्थितांचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान,
उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी संवाद साधला.
याप्रसंगी ह.भ.प. देवीदास महाराज म्हस्के, माजी आमदार पांडुरंग अभंग, महंत रमेशानंदगिरी महाराज, महंत अवेराज महाराज, ह.भ. प. रामनाथ महाराज पवार, लक्ष्मण नारायण महाराज जोंधळे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, गणेश महाराज शेजुळ, नामदेव महाराज कोरडे, अतुल महाराज आदमने, ब्रम्हकुमारी उषा दीदी आदींसह गडाख कुटूंबातल्या सदस्यांसह माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सोबत गेल्या 50 वर्षांपासून काम करत असलेले
अनेक जुने जाणते ज्येष्ठ कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी
माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त भेट आलेली पुस्तकं नेवासा तालुक्यातल्या विविध ठिकाणच्या यशवंत वाचनालयांना भेट देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.