लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल (दि. २१) सामंजस्य कराराच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेत त्यांना महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित केलं. टाटा उद्योग समुहाचे एन. चंद्रशेखरन यांची ह मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा उद्योगसमूह राज्यात तब्बल 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत काल 6 कोटी 25 लाख 457 रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले.
याप्रसंगी काल्सबर्ग समूहानंदेखील महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली असून त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. रिटेल क्षेत्रात कार्यरत असलेले लुलू समूहाचे प्रबंध संचालक एम. ए. युसुफ अली यांची ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. आली यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली.
मास्टरकार्ड ए पी ए सी चे अध्यक्ष लाईंग हाई यांची देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफ्सचे सीईओ मायकल ग्लेंची यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत चर्चा केली. शेती क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्याची चर्चा यावेळी करण्यात आली.