लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा
ज्येष्ठ पत्रकार राजा माने संस्थापक अध्यक्ष असलेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी ‘लोकपत’ न्यूज नेटवर्कचे नेवासा तालुका प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार संभाजी पठाडे यांची नियुक्ती आली. संघटनेच्या उपाध्यक्षपदी किशोर दरंदले, सचिवपदी संजय वैरागर, संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी मोहन शेगर यांची तर खजिनदारपदी ‘लोकपत’चे संपादक बाळासाहेब शेटे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
या संघटनेसंदर्भात बोलताना इकबाल शेख म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी ही संघटना स्थापन केली असून वंचित आणि असंघटित असलेल्या डिजिटल मिडिया या प्लॅटफॉर्मवर काम करत असलेल्या पत्रकार आणि संपादकांना पत्रकारितेच्या प्रवाहात समाविष्ट करुन या सर्वांसाठी राज्य सरकारकडे विविध प्रकारच्या मागण्यासाठी संघटनेच्यावतीने पाठपुरावा करण्याचा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा प्रयत्न आहे.
या संघटनेत सहभागी होणाऱ्या सभासदांना विमा कवच उपलब्ध करुन देण्याचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा निर्धार आहे. डिजिटल संपादक पत्रकार संघटनेचा विस्तार राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना अविरतपणे संघर्ष करत आहे. या संघटनेचं लवकरच रत्नागिरी इथं राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात जास्तीत जास्त पत्रकारांनी नाव नोंदणी करावी, असं आवाहन या संघटनेचे राज्य समन्वयक इकबाल शेख यांनी केलं.
यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक इकबाल शेख यांनी सर्वच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.