लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने केलेल्या प्राणघातक हल्लच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या आणि सर्वत्र उलट सुलट चर्चांना उधाण आलं. आश्चर्यकारक बाब म्हणजे अशा अभिनेत्यांना खासगी सुरक्षा (बाउन्सर) असताना आणि घरात अकरा व्यक्ती असताना सईपर हा हल्ला झाला. या हल्ल्यात कोणा कोणाचा सहभाग आहे, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र डॉक्टरची माहिती अशी आहे, या हल्ल्यामुळे अभिनेता सैफ अली खानला अर्धांगवायू झाला असता. त्या मागची काय कारणं आहेत, हे तुम्ही आता सविस्तर जाणून घ्या.
अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने जो चाकू हल्ला केला, तो चाकू हल्ला डॉक्टरांचं म्हणणं असं आहे, की सैफच्या स्पाइनल कॉर्डपासून अवघ्या दोन मिलिमीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला होता. सैफवर तब्बल सहा वेळा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे. हा चाकू जास्त खोल गेला असता तर ‘स्लाईन फ्लुईड’ लिख होण्याची शक्यता वाढली असती. त्यामुळे सैफच्या संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम झाला असता.
अभिनेता सैफ अली खान मुंबईच्या ज्या ‘पॉश एरिया’त राहतो, त्या भागात सातत्याने वर्दळ असते. पोलिसांची सुरक्षा यंत्रणादेखील त्या भागात नेहमी ‘अलर्ट’ असते. सहा मजली असलेल्या या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर सैफ अली खानचं घर आहे. मात्र अनोळखी व्यक्ती शेजारच्या इमारतीलगतच्या पाईप वर चढून टेरेसवर गेला आणि टेरेसवरून खाली आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीला अजूनही अटक केली नसून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.