Wednesday, January 22, 2025

… तर ऋषिकेश शेटे पाटील ठरणार ‘किंगमेकर’…? विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच दावे आणि प्रतिदाव्यांना आलंय उधाण…!

बाळासाहेब शेटे पाटील

लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

उद्याचा (दि. २३) विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल. पण या निकालाआधीच दावे आणि प्रतिदाव्यांना प्रचंड ऊत आला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता आमदार होणार, अशा आशयाचे फलकदेखील ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. प्रत्येक जण गुलाल आम्हीच उधळणार अशा स्वरुपाचा आत्मविश्वास व्यक्त करत आहे. दरम्यान, उद्या जर महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांचा विजय झाला तर लंघे यांच्या या विजयामागचे ‘किंगमेकर’ ऋषिकेश शेटे पाटील हेच ठरणार आहेत, अशी चर्चा नेवासे तालुक्यात ऐकायला मिळत आहे.

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये विशेषतः नवमतदारांमध्ये आणि महिलांमध्ये प्रचंड असा उत्साह दिसून आला. यापूर्वी 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात त्यांच्याच बालेकिल्ल्यात 40% पेक्षा जास्त मतदान धनुष्यबाणाला पडल्याचा दावा केला जात आहे. ऋषिकेश शेटे पाटील यांना मानणाऱ्या हजारो युवकांचा सहभाग या निवडणुकीत दिसून आला. हे सारे युवक एकदिलानं कामाला लागले.

ऋषिकेश शेटे पाटील हे आमदार व्हावेत, अशी या युवकांची इच्छा होती. विशेष म्हणजे ऋषिकेश पाटील यांनासुद्धा तशी राजकीय महत्त्वाकांक्षा होती. मात्र हा मतदारसंघ ऐनवेळी शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आला आणि इच्छा असूनही ऋषिकेश शेटे पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. विशेष बाब अशी, की कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता ऋषिकेश शेटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत विठ्ठलराव लंघे

यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला नेवासे तालुक्यातल्या हजारो युवकांनी खंबीर साथ दिली.

… आणि ‘देवगावकरां’चा खरा चेहरा उघडा पडला…!

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत दुरंगी लढत निश्चित होती. मात्र देवगावकरांनी विठ्ठलराव लंघे यांच्या पाठीत ऐनवेळी खंजीर खुपसला आणि सत्याची पाठराखण करण्याऐवजी सत्तेसाठी आटापिटा करत वेगळ्याच पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘देवगावकरां’ची प्रस्थापितांसोबत असलेली तथाकथित सेटलमेंट वेळोवेळी ‘एक्सपोज’ करण्याचं काम ऋषिकेश शेटे पाटलांनी प्रामाणिकपणे केलंय. अक्षरशः ‘देवगावकरां’ना ऋषिकेश शेटे पाटलांमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेवर हात ठेवत शपथ घ्यावी लागली. ही शपथ खोटी असल्याचंही ऋषिकेश शेटे पाटलांनी वेळोवेळी फेसबुक लाईव्हद्वारे सांगितलं. ऋषिकेश शेटे पाटील यांच्यामुळेच देवगावकरांचा खरा चेहरा उघडा पडला असल्याचं या निमित्तानं बोललं जात आहे.

 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी