लोकपत डिजिटल मीडिया / पुणे
तनिषा भिसे नावाच्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून न घेता दहा लाख रुपयांचा डिपॉझिट मागितलं आणि या रिसिप्टवर डॉ. घैसास यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे भिसे यांच्या मृत्युला डॉ. भिसे हेच जबाबदार आहेत, असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे.
या संदर्भात बोलताना आमदार गोरखे म्हणाले, की ‘डॉक्टर सुश्रुत घैसास हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधले अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. परंतु डॉक्टर घैसास यांनी या हॉस्पिटलच्या चांगल्या कार्याला कुठं तरी काळीमा फासण्याचं काम केलं आहे. भिसे कुटुंबियांचादेखील डॉ. घैसास यांच्यावर रोष आहे’.
ज्या अर्थी डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला, ते आर्थिक झालेल्या चुकीची त्यांना जाणीव झाली असावी. एक-दोन अहवाल आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असंही आमदार अमित गोरखे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, डॉ. घैसास यांचा राजीनामा अपेक्षित नसून त्यांच्यावर सरकारने संवेदनशीलता दाखवत कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे
यांनी केली आहे.
… आणि मंगेशकर हॉस्पिटलला झाली पुरती…!
एका चालत्या बोलत्या महिलेचा बळी गेल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. या हॉस्पिटलच्या विश्वस्तांची एक बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रसूती, इमर्जन्सीसाठी आलेल्या रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाला हा निर्णय घेण्याची उशिराने उपरती झाली, अशी टीका आता ऐकायला मिळत आहे.