Sunday, June 15, 2025

‘त्या’ प्लॉटच्या लेआऊट खरेदी – विक्रीमध्ये नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीची शक्यता…!

लोकपत डिजिटल न्यूज / अहिल्यानगर 

पाथर्डी नगरपरिषद हद्दीत पाथर्डी – शेवगाव रस्त्यालगत सर्वे क्रमांक 35 / 8 मध्ये हर्षा आनंदकुमार चोरडिया यांनी बेकायदेशीरपणे लेआऊट तयार करून नागरिकांची फसवणूक चालवलेली आहे.
या लेआउटमधून महापारेषण विद्युत विभागाची हाय व्होल्टेज लाईन गेलेली आहे. सदर विभागाची कुठल्याही प्रकारची ना हरकत घेता हा लेआउट केलेला आहे. तसेच नगररचना या विभागाची अंतिम मंजुरी घेतलेली नाही.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची जागा ही लेआऊटमध्ये दाखविलेली आहे. शेवगाव रोडची जी हद्द आहे, ती सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यावरही अतिक्रमण करून सदरचा लेआऊट तयार केलेला आहे. त्या लेआऊटमध्ये चुकीचे रेखांकने दाखवलेली आहेत.

मुख्याधिकारी आणि नगररचना सहाय्यक, नगरपरिषद पाथर्डी यांच्या संगनमताने सदरचा लेआउट हा मंजूर झाले ते दाखवलेले आहे. परंतु सदरच्या लेआउटला 1)महापारेषण2) नगररचना 3) जिल्हा परिषद बांधकाम विभाग 4) सार्वजनिक बांधकाम विभाग यांची कुठलीही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.

तरी मुख्याधिकारी आणि नगर रचना सहाय्यक नगरपरिषद पाथर्डी नगरपरिषद पाथर्डी यांच्या संगनमताने तयार केलेल्या लेआऊटद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. तरी याबाबतच्या प्लॉटची खरेदी विक्री थांबविण्यासाठी आम्ही सब रजिस्ट्रार पाथर्डी, यांना योग्य ते आदेश करण्यासंदर्भात निवेदन दिलं आहे, अशी माहिती शन्नो पठाण यांनी दिलीय.

https://youtube.com/@youngindia-bm99?si=zG9V_5Je_nNA_5xx

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी