लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
शैक्षणिक वाटचालीतला अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास व्हायची वेळ आली तर मुलं नाराज होतात. एका अर्थानं सर्वस्व गमावल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते मात्र तसं न करता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अजिबात खचून जाता कामा नये. दहावी नापास होऊनही पुन्हा परीक्षा देऊन पुढचे शैक्षणिक करिअर यशस्वीरीत्या पार करून यशाच्या शिखरावर पोहोचल्या अनेक तरुणांची उदाहरणं आपल्या आसपास असतात. त्यामुळे निकाल मनासारखा लागला नाही म्हणून खचून जाऊ नका.
असा पहा निकाल :
विद्यार्थ्यांनाे, सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा. तिथं गेल्यावर ‘SSC Examination Result 2025’ या लिंकवर क्लिक करा. समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका. त्यानंतर ‘Submit’ बटणवर क्लिक करा.
दरम्यान, यावर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्यांमध्ये ८, लाख ६४ हजार १२० मुलं, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली तर
१९ तृतीयपंथियांचा समावेश होता. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात २३ हजार ४९२ अक्षय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, दरवर्षीपेक्षा दहा दिवस आधी परीक्षेचे नियोजन केले हाेते. त्यामुळे निकालही लवकर जाहीर होत आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलीय.
इथं पाहा निकाल :
(अधिकृत संकेतस्थळ) https://results.digilocker.gov.in https://mahahsscboard.in http://sscresult.mkcl.org शाळांसाठी https://mahahsscboard.in (in school login)