लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
‘लोकपत’ या ऑनलाईन बातमीपत्राच्या माध्यमातून समाजात सुसंवाद साधला जावा. कोणालाही विनाकारण या बातमीपत्रामुळे धक्का लागू नये. देशप्रेमाबद्दलची भावना यामुळे वाढीस लागावी. जनता जनार्दनाची सेवा ‘लोकपत’ या ऑनलाईन बातमीपत्राच्या माध्यमातून व्हावी, असं वक्तव्य नेवासे तालुक्यातल्या श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख वंदनीय भास्करगिरी महाराज यांनी केलंय.
‘लोकपत’ या ऑनलाईन बातमीपत्राचा छोटेखानी सोहळा देवगडच्या दत्त मंदिर परिसरात पार पडला. प्रारंभी संपादक बाळासाहेब शेटे पाटील यांनी भास्करगिरी महाराजांना ‘लोकपत’
या ऑनलाईन बातमीपत्राविषयीच्या संकल्पनेची माहिती दिली. समाजहिताविषयीचं अंत:करणात असलेलं प्रेम या ऑनलाईन बातमीपत्राच्या माध्यमातून प्रकट व्हावं, असंही भास्करगिरी महाराज यावेळी म्हणाले.