लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
धनंजय मुंडेंसारखे राजकारणात आहेत, तोपर्यंत वाल्मिक कराड तयार होतच राहणार. वाल्मिक कराडला तुरुंगात जी ट्रीटमेंट मिळत आहे, ती आधी बंद करा आणि धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच्या सर्व फाईल्स ओपन करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
यांनी यावेळी केलीय. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधातील सर्व फाईल ओपन कराव्यात. यांच्याविरुद्ध ज्या ज्या केस दाखल करण्यासाठी येतील, त्या सर्व केस देखील दाखल करून घ्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलीय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा गेला खड्ड्यात त्यांना थेट बडतर्फच करा. आता त्यांचा राजीनामा घेतला पण नंतर त्यांना पुन्हा आणण्याचा प्रयत्न झाला तर मी धडा शिकवेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबाविण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लढावा लागणार आहे. यापुढे मी असं काही दिसलं तर पक्षाच्या मुख्य नेत्याला फोन करून राजीनामा मागणार आहे. राज्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही’.