Wednesday, January 22, 2025

धनंजय मुंडे यांचा पत्ता कट …! अजित पवार बीडचे पालकमंत्री…!

लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई 

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला महायुती सरकारच्या मंत्रीमंडळातल्या खातेवाटपाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. काल (१८) रात्री उशिरा राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांनाच देण्यात येणार, अशा वावड्या उठलेल्या असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना मोठा झटका दिला आहे. धनंजय मुंडे याचा पत्ता कट झाला असून बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर स्वतः अजित पवार हेच असल्याचे स्पष्ट झालंय. 

महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार बऱ्याच उशिराने झाला. परिणामी पालकमंत्री पदाच्या घोषणालादेखील खूप उशीर झाला. विशेष म्हणजे प्रजासत्ताकदिनाला अवघ्या सात दिवसांचा कालावधी राहिलेला असताना पालकमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली आणि सामान्य जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला.

कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे?

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस 

नागपूर चंद्रशेखर बावनकुळे 

ठाणे एकनाथ शिंदे 

पुणे अजित पवार 

बीड अजित पवार 

सिंधुदुर्ग नितेश राणे 

अमरावती चंद्रशेखर बावनकुळे 

अहिल्यानगर राधाकृष्ण विखे 

वाशिम हसन मुश्रीफ 

सांगली चंद्रकांत पाटील 

सातारा शंभूराजे देसाई 

छत्रपती संभाजी नगर संजय शिरसाट

जळगाव गुलाबराव पाटील 

यवतमाळ संजय राठोड 

कोल्हापूर प्रकाश आंबेडकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ 

अकोला आकाश फुंडकर 

भंडारा संजय सावकारे 

बुलढाणा मकरंद जाधव 

चंद्रपूर अशोक उईके 

धाराशिव प्रताप सरनाईक

धुळे जयकुमार रावळ 

गोंदिया बाबासाहेब पाटील 

हिंगोली नरहरी झिरवळ 

लातूर शिवेंद्रसिंह भोसले 

मुंबई शहर एकनाथ शिंदे 

नांदेड अतुल सावे 

नंदुरबार माणिकराव कोकाटे 

नाशिक गिरीश महाजन 

पालघर गणेश नाईक 

परभणी मेघना बोर्डीकर 

रायगड अदिती तटकरे 

सिंधुदुर्ग नितेश राणे 

रत्नागिरी उदय सामंत 

सोलापूर जयकुमार गोरे

वर्धा पंकज भोयर 

जालना पंकजा मुंडे 

हे आहेत सहपालकमंत्री…!

मुंबई उपनगर आशिष शेलार 

मुंबई उपनगर मंगल प्रभात लोढा

कोल्हापूर प्रकाश आंबिटकर

कोल्हापूर माधुरी मिसाळ.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी