लोकपत न्यूज नेटवर्क / नागपूर / वृत्तसंस्था
औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केलेल्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये दोन गटात भडकलेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अनेक जणांना ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे यामध्ये ११ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांना विशिष्ट गोष्टीचा संशय असल्याचं पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी म्हटलंय.
सध्या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे, हे सांगताना पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, की या दंगलीनंतर नागपूरमध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीबाबत आम्ही थोडा अभ्यास केला. त्यानुसार, कपिलवन आणि नंदनगड पोलीस स्टेशन हद्दीतून संचारबंदी पूर्णपणे हटविण्यात आली आहे. तर लकडगंज, शांतीनगर, इमामवाडा आणि यशोधरानगर या भागात दोन तासांसाठी संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. इथल्या लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
झोन तीनमधील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ या तीन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात अद्यापही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. या दंगलप्रकरणी आत्तापर्यंत ८० लोकांना ताब्यात घेतलं आहे, याशिवाय ११ अल्पवयीन मुलंही आहेत.
यातील प्रमुख आरोपी इंजिनिअर फहीम खान दोन-तीन ठिकाणी दिसून आल्याचंही पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले, ‘तो सातत्यानं आपला ठिकाण बदलतोय, त्यामुळं त्यावरदेखील लक्ष ठेवलं जात आहे. त्याचा इतिहासही तपासला जात आहे. त्यानुसार या सर्व गोष्टी आम्हाला विशिष्ट गोष्टीकडं घेऊन जात आहेत. पण त्या दिशेनं आमचा तपास सुरु आहे’.
दरम्यान, आम्ही खाली दिलेली लिंक ओपन करा आणि जाणून घ्या, नक्की काय सांगितलंय पोलीस अधिकाऱ्यांनी…!
https://x.com/ANI/status/1902653500854804976?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1902653500854804976%7Ctwgr%5E12cd66a8da6c3b4020b3d4da89572ca22f9fc758%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F