लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा
ग्रामपंचायत निवडणुकीसह अन्य प्रकारच्या निवडणुका लढवून वेळेच्या आत किंबहुना मुदतीत निवडणूक खर्च सादर करुनदेखील लता येडूभाऊ सोनवणे या मागासवर्गीय महिला उमेदवाराविरुद्ध अन्यायकारक कारवाई करण्यात आल्याचा आरोप या महिलेचे पती येडूभाऊ सोनवणे यांनी केला आहे. सोनवणे यांच्यासह अनेक उमेदवारांनी 2015 ते 2017 या कालावधीमध्ये निवडणुका लढविल्या. या सर्वांना तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी नोटीसा पाठविल्या. सोनवणे यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर करुनदेखील निवडणुकीला अपात्र ठरविण्याची अन्यायकारक कारवाई केली असल्याचं येडूभाऊ सोनवणे यांनी म्हटलंय.
या संदर्भात सोनवणे यांनी नक्की काय आरोप केला आहे, त्यांच्यावर कशा प्रकारची अन्यायकारक कारवाई तत्कालीन निवडणुका अधिकाऱ्यांनी केली, या संदर्भात सोनवणे यांनी ‘लोकपत’ न्यूज नेटवर्क अँड यूट्यूब चॅनलशी बोलताना आपबिती सांगितली. काय म्हणताहेत सोनवणे, हे तुम्हीच आता ऐका आणि पहा.