लोकपत न्यूज नेटवर्क नेवासा / प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातल्या कुकाणे गावात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात बारावी इयत्तेत सायन्स विभागात शिकत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून हजारो रुपये उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जेऊर हैबती या गावात राहणाऱ्या शंकर रिंधे नावाच्या जागरुक ग्रामस्थानं थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
या विद्यालयात अभ्यासक्रम शिकविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एका विषयासाठी सातशे रुपये उकळले जात आहेत. याचा थेट व्हिडिओच रिंधे यांनी काढला आहे. ‘लोकपत’च्या लाखो वाचकांसाठी हा व्हिडिओ मुद्दामून आम्ही देत आहोत.
मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा सरकार करत असताना या शाळेत हा काय संतापजनक प्रकार चालला आहे, असा सवाल संतप्त पालकांमधून व्यक्त केला जात आहे. ज्या महिला शिक्षिकेनं हा प्रकार केला आहे, त्या महिला शिक्षिकेविरुद्ध जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग नक्की काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.