लोकपत न्यूज नेटवर्क / पारनेर
पारनेर तालुक्यातल्या पठार भागाच्या शेतीच्या प्रश्नावर सातत्याने राजकारण करण्यात आलं. परंतु विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार निवडून आल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या मागणीचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. या संदर्भातल्या पहिल्या सर्वेक्षणाचा टप्पा सुरू झाला आहे. याबाबत मंत्री विखे यांच्या उपस्थितीत पठार भागात लवकरच पाणी परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिलीय.
पारनेर तालुक्यातल्या कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी या उपसा जलसिंचन योजनांना तत्वतः मान्यता देण्यात संदर्भात आणि चारही योजनांच्या सर्वेक्षणासाठी तातडीने एजन्सी नेमणूक सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले असल्याचंही आमदार काशिनाथ दाते यांनी सांगितलंय.
आमदार दाते म्हणाले, ‘कुकडी खोऱ्यातले पाणी आणि पश्चिम घाटावरील पाणी अडवून कृष्णा खोऱ्यामध्ये वळवले जाणार असल्याने या वाढणाऱ्या अनेक क्षमतेतून पारनेर तालुक्यातल्या चार उपसा जलसिंचन योजनांना तत्वतः मान्यता देण्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री विखे यांच्याशी चर्चा झाली’.