लोकपत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर
तुम्हाला जर तुमच्या पत्नीने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही हा निर्णय नक्कीच घ्या. या निर्णयामुळे तुमचं कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम तर होईलच. पण भविष्यात तुमच्या कुटुंबातल्या कोणालाच आर्थिक चणचण भासणार नाही. पैशांसाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. तर हे कसं करायचं, हे आता या बातमीत आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत मन लावून वाचा.
तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावाने नॅशनल पेन्शन स्कीम असं राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडायचं आहे. ते खाता उघडल्यानंतर तुम्हाला नक्की कोणते आर्थिक फायदे मिळतील, हे आता जाणून घ्या. 1000 रुपये भरून तुम्ही हे खातं सुरू करू शकता. तुमची पत्नी जर तीस वर्षांची असेल आणि तुम्ही दर महिन्याला पाच हजार, सात हजार अशी रक्कम त्या खात्यावर टाकत असाल तर साठ वर्षानंतर तुमच्या पत्नीला 45 लाख रुपये मिळतील आणि दर महिन्याला 45 हजार रुपये हजार रुपये मिळतील.
केंद्र सरकारची ही योजना असून या योजनेत तुम्ही गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात. सोशल सेक्युरिटी स्कीम असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांचं नियोजन प्रोफेशनल फंड मॅनेजर हे करत असतात. मात्र या पैशांवर भविष्यात तुम्हाला जास्तीत जास्त परतावा (रिटर्न्स) मिळेल, याची खात्री नाही. फायनान्सियल प्लॅनर्सच्या मतांनुसार दहा किंवा अकरा टक्के परतावा तुम्हाला मिळू शकतो. तर मग चिंता करू नका. भविष्यात तुमच्या पत्नीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निर्णय घ्या.