लोकमत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
मोठ्या पडद्यावर साकारणारा सनकी नायक आणि स्वभावात अत्यंत तापट आणि परखडपणा असलेल्या चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांना संपूर्ण देश ओळखतो. त्यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर असून ‘गमन’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. नाना पाटेकर यांना आतापर्यंत तीन राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्म फेअर आणि 2013 मध्ये सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे.
या बातमीच्या माध्यमातून नाना पाटेकर यांचे शिक्षण किती झाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. खरंतर ही माहिती अनेकांना माहित आहे. मात्र अगदीच मिसरूड फुटलेल्या पण सोशल मीडियावर तसं घालवणार आहे नवख्या पोरांसाठी ही माहिती आम्ही खास मुद्दामून देत आहोत.
नाना पाटेकर यांची कौटुंबिक माहिती द्यायची झाली तर त्यांना दिलीप आणि अशोक हे दोन भाऊ आहेत त्यांच्या पत्नीचे नाव नीलकांती पाटेकर असून त्बँया क अधिकारी होत्या. नाना पाटेकर यांच्या एका मुलाचे निधन झाला असून त्यांच्या सध्याच्या मुलाचे नाव मल्हार पाटेकर असं आहे.
नाना पाटेकर यांचा जन्म रायगडचा आहे मात्र मुंबईतूनच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. मुंबईच्या वांद्रे जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. नाना पाटेकर यांचे विषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली, याविषयी नक्कीच कळवा.