लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली / प्रतिनिधी
बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. या संदर्भात भारताने आक्रमक पाऊल उचललं आहे. येत्या सोमवारपासून (दि.९) भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री
हे बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा ते तिथं मांडणार आहेत.
बांगलादेशातलं शेख हसीना
यांचा सरकार उलथवून टाकल्यानंतर पहिल्यांदाच बड्या मुत्सुद्याचा तिकडे दौरा होणार आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितलं, की अलीकडील घटनांवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. बांगलादेशची हिंदू संस्था ‘सनातनी जागरण ज्योत’चे प्रवक्ते चिन्मय प्रभू
यांच्या अटकेसंदर्भात जैस्वाल म्हणाले, की बांगलादेश न्यायिक अधिकारांचे रक्षण करेल अशी आशा आहे’. दरम्यान, 3 डिसेंबर रोजी जी सुनावणी झाली त्यामध्ये चिन्मय प्रभू यांची बाजू एकाही वकिलाने मांडली नाही.