लोकपत न्यूज नेटवर्क / पाथर्डी
‘आमच्या देवाचा प्रसाद तुम्ही खात नाहीत. तर मग आमच्या देवाचा प्रसाद विकता तरी कशाला, असा प्रश्न उपस्थित करत अवैध व्यवसाय करणारे आणि पशुहत्या करणाऱ्यांना कानिफनाथांच्या मढी गावच्या यात्रेत प्रवेश नाही, असा महत्वपूर्ण निर्णय दिनांक 12 रोजी 127 विरुद्ध 327 अशा मतांनी घेण्यात आला. विशेष म्हणजे जे ग्रामस्थ सरपंचांच्या गटाचे नाहीत, त्यांनीदेखील सहानुभूती दाखवत या निर्णयाच्या बाजूने मतदान केल्यामुळे मतदानाची आकडेवारी वाढली. दरम्यान, या निर्णयाचं ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ अशा घोषणा देत उपस्थित ग्रामस्थांनी स्वागत केलं.
मढी गावचे सरपंच संजय मरकड यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसभा शांततेत पार पडली. मढी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही बाजूंनी मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या प्रचंड होती. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मुस्लिम बांधवांना मढीच्या यात्रेत प्रवेश नसल्याचा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला, त्यावेळी मोठा वाद उभा राहिला होता. ॲड. प्रताप ढाकणे यांनी कार्यकर्त्यांमार्फत या संदर्भात याचिका दाखल केली होती. या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं.
अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप, मंत्री नितेश राणे यांच्या संवेद संत म्हणतांनी या निर्णयाच्या बाजूने पाठिंबा दिला होता. दिनांक 12 मार्च रोजी झालेल्या ग्रामसभेत मढी गावच्या आणि कानिफनाथांच्या रुढी- परंपरा न पाळणाऱ्या लोकांवर चर्चा झाली. या ग्रामसभेनंतर मढी तिसगाव आणि पाथर्डीत त्यांना सदस्य परिस्थिती पाहायला मिळाली. पाथर्डी पोलिसांनी मात्र या परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं.