Wednesday, January 22, 2025

पाकिस्तातून थेट परळीत ड्रग्ज तस्करी… ! काय आहे आमदार सुरेश धस यांचा आरोप? नक्की जाणून घ्या…!

लोकपत न्यूज नेटवर्क / धाराशिव

बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीचे अधिकार्‍यांना मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाचा बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेसह राज्यातल्या विविध जिल्ह्यात आक्रमक होत आवाज उठवला आहे. सरपंच देशमुख हत्याप्रकरणी  काल (दि. ११) धाराशिव जिल्ह्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात बोलताना आमदार सुरेश धस यांनी मोठा खळबळजनक आरोप केलाय.

या निषेध मोर्चादरम्यान आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बीडच्या महासंस्कृती महोत्सवावर दहा लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र सरकारी तिजोरीतून 5 कोटी काढून त्यांनी स्वतःचे खिसे भरले. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळ काढून टाका, अशी ही आग्रही मागणी आमदार धस यांनी या मोर्चात बोलताना केली. 

पाकिस्तानातून भारतात ड्रग्ज तस्करी होत असल्याचं यापूर्वीच समोर आलेलं आहे. गुजरातमध्ये 890 कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. या प्रकरणातले कृष्णा सानप आणि दत्ता आंधळे हे दोघे वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत या दोघांचे फोटो आहेत. मुंडे हेच ‘मेन’ ‘आका’ असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरारच आहे. सीआयडीने त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मीक करायला अटक करण्यात आलेली आहे. तूर्तास सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग आढळून आला नाही. त्यामुळे त्याला मोक्काच्या गुन्ह्यातून आलं असल्याचं म्हटलं जात आहे. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी