Monday, April 28, 2025

पारनेरच्या सुपा भागातल्या एलएलपी कंपनीचं फॉरेन्सिक ऑडिट करा : गुंतवणूकदारांनी केली पोलिसांकडे मागणी…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याच्या सुपा परिसरात पंढरपूरच्या ‘या’ तरुणासह त्याची पत्नी अशा मंगळवेढ्याच्या आमदाराचे तथाकथित नातलग असलेल्या दांपत्याने इंडिया (एलएलपी) कंपनीमार्फत गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक व्याजदर देण्याचं आश्‍वासन देत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या ठेवी घेतलेल्या आहेत. सदर कंपनी बंद पडण्याच्या अगोदर या कंपनीची तज्ञ सीए यांच्या माध्यमातून फॉरेन्सिक ऑडिट तज्ञ करण्याची मागणी अनेकांनी पोलिसांकडे  करण्यात आली आहे.

या कंपनीने अनेक शेतकरी आणि कामगार वर्गांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी घेतलेल्या आहेत. अनेकांनी कर्ज काढून तर आपल्या जीवनाची पूंजी या कंपनीत गुंतवली आहे. कोट्यावधींचा टर्न ओव्हर असलेल्या या कंपनीच्या शासकीय नोंदणीचे दाखले, कंपनीच्या सेबी आणि ए.एम.एफ.आय.कडील नोंदणीचे दाखले, कंपनीच्या मालकांच्या तपशील कागदपत्रांसह, कंपनीच्या मागील तीन वर्षांचा इन्कम टॅक्स, ताळेबंद, ऑडिट रिपोर्ट, मागील वर्षाचे बँक स्टेटमेंट याची चौकशी करण्याचे निवेदनात म्हटलं आहे.

ही कंपनी गुंतवणूकदारांना अवास्तव परताव्याची आश्‍वासन देते, तो परतावा देण्यासाठी कंपनी कोणता व्यवसाय करते, त्याचे पुराव्यासह स्पष्टीकरण गुंतवणूकदारांना मिळण्याची गरज आहे. कंपनी परतावा देताना आणि गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारचा दस्तावेज गुंतवणूकदारांना दिला जात नसल्याचं म्हटलं आहे.

अहिल्यानगर तालुक्यातल्या रांजणी माथणी या गावातल्या  संदीप सुधाकर थोरात लबाड आणि कावेबाज इसमानं अशाच पद्धतीच्या अनेक कंपन्या स्थापन करुन गोड गोड बोलत गुंतवणूकदारांना आर्थिकदृष्ट्या फसवलं. संदीप थोरात

याच्याविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेवगाव पोलीस ठाण्यात देखील थोरांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. थोरात याला अटक करण्यात आली असली तरी ज्यांना ज्यांना थोरात यानं फसवलं, त्या गुंतवणूकदारांना न्याय मिळेल की नाही, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे पंढरपूरच्या या दांपत्याकडून गुंतवणूकदारांच फसवणूक होऊ नये, यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी