Monday, April 28, 2025

पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत तुमच्या निधीतून झालेल्या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी कराल का? कामं न करताच बीलं काढणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई होईल का? जनतेच्या कररुपी पैशांवर मारला गेलाय डल्ला…!

बाळासाहेब शेटे पाटील 

Mo. No. 70 28 35 17 47

लोकपत डिजिटल मीडिया /  अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे पाळंमूळं अगदी खोलवर रुजली आहेत. हा भ्रष्टाचार करणाऱ्यांमध्ये फक्त सरकारी अधिकारीच नाहीत तर स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या निधीतून अहमदनगर (अहिल्यानगर) बोर्डाच्या हद्दीत पायाभूत सुविधांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या निधीतून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अर्थात भिंगार शहर आणि परिसरात रस्त्यांची काम करण्यात येणार होती. यामध्ये किती ठिकाणच्या रस्त्यांची कामं झाली, हा संशोधनाचा विषय आहे. 

दुर्दैवाची बाब अशी, की अनेक ठिकाणच्या रस्त्यांची कामं न करताच लाखो रुपयांची बीलं काढण्यात आली असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. ही बिल काढणाऱ्यांमध्ये भिंगार शहरातलेच काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते सहभागी असून या कार्यकर्त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचा वरदहस्त असल्याचं बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमचा मुख्य सवाल हा आहे, की पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत तुमच्या निधीतून झालेल्या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी कराल का? कामं न करताच बीलं काढणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई होईल का? जनतेच्या कररुपी पैशांवर मारला गेला असताना सरकारी यंत्रणा मूग गिळून गप्प का आहे? या सर्व कामांची चौकशी करण्यात येऊन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी भिंगारचे नागरिक आणि व्यापारी वर्गातून केली जात आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत भिंगारचे सात प्रभाग येतात. या सातही प्रभागांमध्ये पायाभूत सुविधांच्या कामांची सुरुवात करण्यात येणार होती. प्रत्यक्षात किती ठिकाणी कामं झाली, त्या कामाची अवस्था सध्या काय आहे, याची सरकारी यंत्रणेनं गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं न करताच बीलं काढण्याचा जो गंभीर प्रकार आहे, तो जर उघडकीस आला, तर या भ्रष्टाचाराचा नक्की कोणाकोणाचे हात बरबटलेले आहेत, हे समोर येईल. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भ्रष्टाचाराचा हा प्रकार जनतेसमोर आणण्याचं धाडस करावं, अशी अपेक्षा भिंगारची जनता करत आहे.

अभियंत्यांच्या डोळ्याला भात बांधलाय का? 

पायाभूत सुविधांची काम करताना त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातात. या निविदा मंजूर करताना योग्य ती खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने घ्यायची असते. परंतु रस्त्यांची कामं न करताच बिल काढण्याची हिम्मत जर कोणी केली असेल तर त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची जबाबदारी या अभियंत्यांची असते. परंतु जनतेमधून या कामांविषयी प्रचंड नाराजी आहे. रस्त्यांच्या कामाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कामं न करताच न करताच बीलं काढण्याची काही करण्यात आले असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंते आहेत, त्यांच्या डोळ्याला भात बांधला आहे का, हाच खरा प्रश्न आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी