लोकपत न्युज नेटवर्क / पुणे / प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यात असलेल्या शिक्रापूरचे उपसरपंच आणि शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय गिलबिले यांची मालमत्ता आणि इतर कारणांतून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ते बंगल्याच्या आवारातल्या खुर्चीवर बसले असताना अज्ञात इसमाने धारदार शस्त्रानं त्यांच्या मानेवर वार केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिक्रापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येची बातमी पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. पोलीस हल्लेखोरांच्या मार्गावर असल्याचं शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितलं.