लोकपत न्यूज नेटवर्क / पुणे / प्रतिनिधी
पुणे विद्येचं माहेरघर. पुणे तिथं काय उणे. असं म्हणण्याऐवजी यानंतर आता पुणे तिथं काय काय होणे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. ज्या घटनेची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत, ती वाचून कुठल्याही संवेदनशील सहृदयी माणसाच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत नक्की जाईल. माणुसकीला काळिमा फासणारी आणि पुण्याला
बदनाम करणारी ही घटना नक्की काय आहे, ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा आणि जाणून घ्या.
एका अल्पवयीन मुलीशी दोघांनी प्रेमाचं खोटं नाटक केलं. तिला लग्नाचेदेखील आमिष दाखवलं. वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परिणामी ती गरोदर राहिली. 25 नोव्हेंबर रोजी तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. 19 डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, तिच्या मृत्युला जबाबदार धरत पोलिसांनी निखिल उर्फ मिक्या गणेश दीक्षित (रा. अप्पर बिबवेवाडी, पुणे) आणि साईदत्त उर्फ साहिल गोपाळ भवाळ (रा. दांडेकर पूल) या दोघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.