लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या पांढरीपूल परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. आजपर्यंत या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला. काल (दि. ५) या परिसरात झालेल्या अपघातामध्ये बंडू भवार हे हॉटेल व्यावसायिक ठार झाले. या महामार्गाची देखभाल आणि दुरुस्तीचे काम जो विभाग करतो, त्या जागतिक बँक प्रकल्प विभागाचे डोळे कधी उघडणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
इमामपूर घाटातून येणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड असतो. त्यातल्या त्यात अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहन चालक डिझेल वाचविण्याच्या माल ट्रक गियरमध्ये न ठेवता न्युट्रलमध्येच दामटवितात. त्यामुळे अत्यंत बेजबाबदारपणे असे अपघात होत आहेत. हे अपघात असेच होत राहिले तर या गावची लोकसंख्या कमी होईल, अशी भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.