Wednesday, January 22, 2025

पेटीएमचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढले …!

लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी

पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढले आहेत. ट्रेडिंग दरम्यान कंपनीचे शेअर्स 990.99 रुपयांच्या एका वर्षातले अर्थात 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

 

गेल्या पाच दिवसांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 7.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात 22.27 टक्के आणि सहा महिन्यांत 181.36 टक्के तर एका वर्षात 20 टक्के वाढ झाली आहे. शेअरच्या किंमतीने एवढा उच्च घातला असताना अशी एक बातमी आहे, देशांतर्गत असलेली फिटनेक कंपनी जपानच्या pay pay मधील आपला हिस्सा सॉफ्ट बँकेला 2 हजार 117 कोटी रुपयांना विकू शकते.

पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीने ऑगस्ट 2009 मध्ये पेटीएम पेमेंट ॲप लॉन्च केलं. विजय शर्मा या ॲपचे संस्थापक आहेत. पी टी एम सी मार्केट कॅप 28 हजार आहे. देशभरात 30 कोटीहून अधिक पेटीएम चे वापरकर्ते आहेत.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी