लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील ॲडव्होकेट सयाराम बानकर यांच्या मातोश्री केशरबाई तुकाराम बानकर
यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. जुन्या पिढीतल्या केशरबाई या धार्मिक आणि मनमिळाऊ वृत्तीच्या होत्या. स्वर्गीय केशरबाई या पोलीस पाटील, ॲडव्होकेट बानकर, शनैश्वर गॅस एजन्सीचे संचालक बाळासाहेब बानकर यांच्या मातोश्री तर शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. रावसाहेब बानकर यांच्या चुलती होत्या.
स्वर्गीय केशरबाई बानकर यांच्या निधनाबद्दल अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, संभाजी राजे दहातोंडे आदींसह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत यूट्यूब चॅनलचे संपादक बाळासाहेब शेटे पाटील यांनी आज (दि. ४) पोलीस पाटील ॲडव्होकेट सयाराम बानकर यांच्या निवासस्थानी भेट देत बानकर कुटुंबियांचं सांत्वन केलं.