लोकपत न्यूज नेटवर्क / सोनई
नेवासे तालुक्यातल्या सोनई – कांगोणी रस्त्यालगतच्या शिकारे वस्ती इथे राहत असलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतीसह आयुर्वेदिक उत्पादनांचं मार्केटिंग करणारे गोरक्षनाथ कारभारी शिकारे यांचं काल (दि. २७) रात्री साडे अकराच्या सुमारास अल्पशा आजारानं निधन झालं. ते ३९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय, एक मुलगा, दोन मुली, पुतणे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक ते शिक्षण अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झालेले कारभारी शिकारे यांचे स्व. गोरक्षनाथ शिकारे
हे ज्येष्ठ सुपुत्र होते.
स्व. गोरक्षनाथ शिकारे हे उच्च शिक्षित शेती विभागात तज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. आयुर्वेदिक औषधांसह शेतीच्या औषधाचं मार्केटिंग करत असताना त्यांचा अनेकांशी परिचय झाला होता. हसतमुख आणि सुस्वभावी असलेल्या गोरक्षनाथ शिकारे यांच्या अकाली निधनाबद्दल अनेकांनी आश्चर्य आणि दुःख व्यक्त केलं आहे.
लहान भावाला केलं योग्य मार्गदर्शन…!
स्व. गोरक्षनाथ शिकारे हे मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत नातेवाईकांशी फोनवर बोलत होते. रात्री बरोबर अकरा वाजता त्यांनी त्यांच्या लहान भावाला फोन केला आणि आई-वडिलांची काळजी घे. वडिलांना त्रास होईल असं काही करु नको. मुलींना शिकून मोठं कर. अशा प्रकारचं मार्गदर्शन स्व. गोरक्षनाथ शिकारे यांनी केलं. त्यांच्या अकाली निधनाबद्दल पंचक्रोशीच हळहळ व्यक्त केली जात आहे.