लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
लोकप्रतिष्ठा जपण्याचा निर्धार करत सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं व्रत आम्ही (लोकपत न्युज नेटवर्क, अहिल्यानगर) हाती घेतलं आहे. या सर्वसामान्यांमध्ये महिलांचासुद्धा समावेश आहे. परंतू काही महिला खोटा बेबनाव करुन प्रेमाचं नाटक करत एखाद्याला आर्थिकदृष्ट्या फसवत असतील तर अशा महिलांची बाजू आम्ही का घ्यावी, हाच मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, अहिल्यानगरमध्ये मागील काही वर्षांत ‘हनी ट्रॅप’ची जोरदार चर्चा ऐकायला मिळत होती. मध्यंतरी, याविषयीची चर्चा काहीशी थांबली होती. परंतु अहिल्यानगरमध्ये अजूनही ‘हनी ट्रॅप’ सुरुच असल्याचा प्रत्यय नुकताच आला आहे. विवाहित पुरुषांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडे पैशांची मागणी करायची. मात्र ती मागणी पूर्ण झाली नाही की लगेचच भारतीय दंड विधान कलम 376 अन्वये पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन पोलिसांना संबंधित इसमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करायला भाग पाडायचं, असा तो डाव आहे. अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात
या प्रकरणी काल (दि. २९) रात्री उशिरा एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासे तालुक्यातल्या सोनईत राहणाऱ्या राहुल दरंदले या तरुणाविरुद्ध 38 वर्षाच्या एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दिली. विशेष म्हणजे या महिलेनं दरंदले याच्याशी प्रेमाचं नाटक करत पाच ते सहा वर्षे ती दरंदले याच्याबरोबर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांनी तिने अहिल्यानगरच्या बालिकाश्रम परिसरात राहणाऱ्या एका तरुणाबरोबर लग्नही केलं असून सदरच्या या तरुणाचा ‘हनी ट्रॅप’मध्ये सहभाग असल्याचीही जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
या गंभीर गुन्ह्याचा सखोल तपास झाला आणि सदर महिलेची कसून चौकशी करण्यात आली तर पोलीस तपासात ही बाब पुढे येणारच आहे.
राहुल दरंदले आणि 38 वर्षीय या महिलेची इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि त्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. विशेष म्हणजे राहुल दरंदले याचं 12 वर्षांपूर्वी लग्नही झालेलं आहे. त्याचे वडील प्रतिष्ठित घराण्यातले असून असला घाणेरडा प्रकार त्यांना अजिबात माहीत नव्हता. मात्र काल संध्याकाळी जेव्हा हे सारं समजलं, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. सदर महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केल्याचंही राहुल दरंदले यांच्या वडिलांनी खासगीत बोलताना सांगितलंय.
महिला अत्याचार प्रकरणातल्या खऱ्या अपराध्याला शिक्षा अवश्य व्हायला हवी. पण निरपराध व्यक्तीचा अशा खोट्या प्रकरणांमध्ये बळी जाता कामा नये, यासाठी खरं तर लोकपत न्युज नेटवर्कचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्या तरुणाविरुद्ध भादंवि 376 प्रमाणे गुन्हा दाखल झाला, त्या राहुल दरंदलेचे वकील या प्रकरणात कशा पद्धतीने युक्तिवाद करतात, यावरच सदर तरुणाचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र भविष्यात अशा
‘हनी ट्रॅप’मध्ये कोणाचीही आर्थिक फसवणूक होऊ नये, विनाकारण बदनामी होऊ नये, यासाठी सर्वच तरुणांनी या घटनेतून बोध घ्यावा, अशी आमची माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.