Monday, April 28, 2025

प्रजासत्ताकदिनी दहिगाव ग्रामपंचायतीनं नाही केलं ध्वजारोहण…! सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध राष्ट्रद्रोहाची कारवाई करा…! सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांची मागणी…! अहिल्यानगर ‘कलेक्टर’सह राष्ट्रपतींना पाठवलं निवेदन…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

नगर तालुक्यातल्या मौजे दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयावर २६ जानेवारी रोजी राष्ट्रीय उत्सवाचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आलेला नाही. या गंभीर गुन्ह्याबद्दल संबंधितांविरुद्ध तात्काळ प्रभावी कारवाई करण्यात यावी. अन्यथा दोन दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांनी दिला आहे. 

महोदय या संदर्भात अहिल्या नगरच्या जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हस्के यांनी म्हटले आहे, की मी दहिगाव येथील रहिवासी आहे. मी एक सामाजिक कार्यकर्तादेखील आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे मी सामाजिक कार्य, देश प्रेमी समाज कार्य करत आहे. २६ जानेवारी राष्ट्रीय उत्सव नेहमी प्रमाणे साजरा केला जातो. त्याप्रमाणे श्रीराम हायस्कूल या ठिकाणी राष्ट्रीय उत्सवाचा तिरंगा फडकविण्यात आला.

त्यानंतर दहिगावमधील सहकारी बँक शाखा या ठिकाणी ध्वज फडकविण्यात आला. आणि मी त्यानंतर दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयसमोर ध्वज फडकविला जाईल, याची मी प्रतीक्षा करत होतो. पण मनमानीपणे कारभार करणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नाही.

यादिवशी कोणत्याही प्रकारची ग्रामसभा घेण्यात आली नाही. किंबहुना तशी सुचना देण्यात आली नाही. सकाळी ध्वज संहितेप्रमाणे ध्वज फडकविला जाईल, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ वाट पाहत होते. पण त्याठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यासाठी ना ग्रामपंचायत शिपाई, ना ग्रामसेवक, सरपंच त्याठिकाणी आले.

या विषयाचा सर्वात मोठा पुरावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६ GHV कंपनी CCTV कॅमेरा रस्ता मधोमध बसवला आहे. यात संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय सर्व परिसर येतो. सर्व चित्रीकरण जी.एच.व्ही कंपनी कार्यालय, मांडवगण फाटा याठिकाणी नियंत्रण कक्ष आहे. तिथे सर्व हालचाल चित्रण उपलब्ध होईल.

यासंदर्भात उच्चस्तरीय समिती पोलीस, महसूल, ग्रामविकास, राष्ट्रभक्त कार्यकर्ते घेऊन नेमुन सदर विषयाचा अहवाल प्रमाणे कायदेशीर कडक कारवाई करावी. दरम्यान, या विषयावर मी (सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के) पंचायत समिती कार्यालय प्रमुख बनकर (मोबाईल क्रमांक 077210 41429) यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पण तो संपर्क होऊ शकला नाही. तदनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत माळी (मोबाईल क्रमांक 82082 28400)  यांच्याशी सकाळी 7.56 वाजता संपर्क करून सर्व हकीकत कथन केली. परंतू मी रजेवर आहे. दहिगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची यासाठी नेमणूक केली आहे.

ध्वजारोहणासाठी ज्यांची नियुक्ती करण्यात आली, ते ग्रामसेवक कोणते, याबाबतीत कल्पना नसल्याचं त्यांनी कळवले. ध्वजारोहण होत नसल्याने मी दहिगाव ग्रामसेवक घोडके यांना (मोबाईल क्रमांक 88309 80764) सकाळी 7.53 वाजता यावर संपर्क साधाण्याचा प्रयत्न केला. परंतू फोन समोरून न उचल्यानं संपर्क होऊ शकला नाही.

याठिकाणी आपण ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आहात. यावर काय कारवाई करणार, याबाबत विचारणा केली. त्यांनी गटविकास अधिकारी किंवा विस्तार अधिकारी खाडे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून चौकशी करू शकता. खाडे यांना (मोबाईल क्रमांक 94231 63909) सकाळी 7.58 वाजता ध्वजारोहण वेळेत संपूर्ण प्रकार कथन करण्यात आला.

त्यांनी सांगितलं, माझ्या मुलीच्या विवाहनिमित्त मी सुट्टी रजेवर आहे. याबाबत मला काहीही कल्पना नाही. मी विनंती करून वरिष्ठांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनी पंचायत समिती नगर गटविकास अधिकारी मगर यांचा संपर्क क्रमांक 99237 25019 सकाळी वेळ 8.39 वाजता दिला. यावरून संपूर्ण प्रकार कल्पना दिल्यावर संपूर्ण घटना मगर नामक गटविकास अधिकारी यांना कळवली. परंतु त्यांनी ठरलेल्या वेळेत ध्वजारोहण होईल, असं कळवलं आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक बंद करून ठेवला.

मी सकाळी 11.20 ,11.21 वाजता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. ग्रामपंचायत कार्यालयासमोर बराचसा वेळ थांबून प्रतिक्षा केली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा,  दहिगाव याठिकाणी ध्वजारोहणासाठी गेलो. त्याठिकाणी मी माईकवर जे ग्रामसेवक नेमणूक केली आहे, असे कर्मचारी संपर्क क्रमांक मागणी केली. तेव्हा कर्मचारी यानी सध्या अतिरिक्त ग्रामसेवक वाटेफळ यांची नेमणूक केली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 94237 87573 घेतला.

सकाळी 10.49 वाजता संपर्क करून दहिगाव ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी ध्वजारोहण झाले नाही. याबाबत मला माहीत उपलब्ध असेल तर कळवावे. त्यांनी मला दहिगावमधील शिक्षकांना लेखी पत्र दिले आहे. ते ग्रामपंचायत कार्यालय ध्वजारोहण, ग्रामसभा विषय पाहतील असे कळवले शिक्षकांना या विषयावर विचारणा केली असता आम्ही आमची शाळा सोडून इतर ठिकाणी कार्यक्रमाला जाऊ शकत नाही, असे तोंडी कळवले.

मी बराच वेळ जिल्हा परिषद शाळा दहिगाव या ठिकाणी राष्ट्रीय उत्सवाचा भाषण कार्यक्रम ऐकत होतो. सदर कार्यक्रम मी माझ्या shiva mhaske या फेसबुक लाईव्ह केले. अनेक भाषण यात आहे.परंतु संपूर्ण दिवभरत ध्वजारोहण झाले नाही. त्यामुळे गंभीर विषयावर आपण योग्य ती कारवाई करावी.

ध्वजारोहण न झाल्यामुळे राष्ट्रीय उत्सवाचा अपमान झाला आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी योग्य ती कारवाई करावी,  त्यांचे निलंबन करावं. अन्यथा आत्मदहन करण्यात येईल. 

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते म्हस्के यांनी राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मुंबई आदींसह सर्व संपादक, दैनिक वर्तमानपत्रांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी