Sunday, April 27, 2025

प्रधान सेवक मोदीजी, देशातल्या गद्दारांना शोधा आणि बुलडोझरखाली ढकला…! पाक, चीन आणि बांगलादेशाचाही बंदोबस्त कराच…!

लोकपत डिजिटल मीडिया /  अहिल्यानगर 

अखंड हिंदुस्तानला फाळणीचं ग्रहण लागलं आणि पाकिस्तानसह अनेक स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. मुस्लिमबहुल राष्ट्रांचा तर यात वेगळाच कपटी डाव पाहायला मिळत आहे. देशाभिमानी आणि धर्माभिमानी असलेल्या भारतवासियांना सतत पाण्यात पाहत काही ना काही कारणांवरून कुरापती करायच्या आणि संधी मिळताच घुसखोरी करायची. आतंकवादाचं

तरुणांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांच्या मनात तीव्र द्वेष भावना निर्माण करायची. हिंदुस्तानमध्ये सतत घातपाती कारवाया करायच्या, हाच पाकिस्तानचा आणि अन्य राष्ट्रांचा कपटी डाव दिसून येतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशाचे प्रधान सेवक (पंतप्रधान) असलेल्या नरेंद्र मोदी

यांना जाहीरपणे सांगावसं वाटतं, की देशातल्या गद्दारांना शोधा आणि बुलडोझरखाली ढकला.

हिंदुस्थानाला एकट्या पाकिस्तानपासूनच दहशतवादाचा धोका आहे, असं नाही. तर चीन आणि बांगलादेश हे दोन्ही देश प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आतंकवादाला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे या दोन्हीही देशांचा या देशाच्या कारभाऱ्यांनी बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. पाणी बंद केल्यामुळे आणि हिंदुस्ताननं युद्धाची तयारी सुरु केल्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे.

मात्र ही पाकिस्तानची दरवेळची नाटकं आहेत, ही बाब पंतप्रधान मोदी यांच्यासह हिंदुस्तानच्या इतर महत्वपूर्ण नेत्यांनीदेखील ध्यानात घ्यायला हवीय.

हिंदुस्थानच्या सरकारने युद्धासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रांस्त्रांची खरेदी केलेली असून त्याचे प्रयोगदेखील सुरू करण्यात आले आहेत. परंतु आता वेळ न दवडता थेट या शस्त्रांस्त्रांचा पाकिस्तानसाठी वापर करावा, अशी देशवासियांची अपेक्षा असली तरी युनायटेड स्टेट ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघटनेचे सदस्यत्व भारताकडे असल्यामुळे युद्धाला थेट सुरुवात करणं योग्य होणार नाही.

देशातल्या गद्दारांविषयी बोलायचं झाल्यास या असल्या अपप्रवृत्तींमुळेच दहशतवादी बिनधास्तपणे हिंदुस्तानमध्ये येऊन दहशतवाद पसरवित आहेत. या दहशतवादी कारवायांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. या देशाला गद्दारीचा फार मोठा कलंक लागलेला आहे. या अप्रवृत्ती पाठीत वार करत असल्यामुळे देशांतर्गत असलेल्या शत्रूला ओळखणं कठीण जात आहे.

त्यामुळे इथून पुढच्या काळात अशा देशातल्या गद्दारांना ओळखून वेळच्या वेळी ठेचून काढलं तर हिंदुस्तानमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी