लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
शारीरिकदृष्ट्या ‘फिट’ राहण्याचा मूलमंत्र आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत. दिवसातून फक्त एकदाच सात मिनिट ही एक्सरईज किंवा कसरत केल्यास तुमच्या शरीरात ठीक ठिकाणी जमा झाली चरबी नाहीशी तुमच्या पोटाचा घेरसुद्धा कमी होऊ शकतो. काय आहे ही कसरत आणि ती कशी करायची, याविषयी आता तुम्ही व्यवस्थितपणे जाणून घ्या.
‘हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग’ असं या कसरतीचं नाव आहे. ही कसरत कशी करायची, ती आता मी तुम्हाला सांगत आहोत. यातल्या पहिल्या प्रकारात जम्पिंग जॅक हे तुम्हाला करायचं आहे. एक मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भरपूर उड्या मारायच्या आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होऊ लागते. या कसरतीमुळे तुमचे खांदे, मणके आणि इतर अवयवांचं दुखणं दूर होऊ शकतं.
या कसरतीमध्ये तुम्हाला पुश अप करायचं आहे. पुश अपमुळे तुमचे खांदे, ट्रायसेप्स, छाती आणि पोटाचा व्यायाम होतो. दररोज एक मिनिट प्लॅंक केल्यामुळे पोटातली चरबी कमी होते. सुरुवातीला तुम्ही फक्त पंधरा सेकंद प्लॅंक करू शकता. त्यानंतर एक मिनिटापर्यंत करू शकता.
याशिवाय तुम्ही रामदेव बाबा सांगतात त्या पद्धतीनुसार वेगवेगळे प्रयोग केल्यास तुमच्या पोटाचा घेर कमी होऊ शकतो. अर्थात हे सर्व करत असताना तुम्ही तज्ञांची मदत आणि मार्गदर्शन केले अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या मनाने वेगवेगळ्या कसरती करत असताना तुमच्याकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय हे सारे करणं जोखमीचं ठरणार आहे.