Saturday, June 7, 2025

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन ऑल आउट’…! अहिल्यानगर एलसीबीच्या पोलिसांनी वाचविले ७९ गोवंशीय जनावरांचे प्राण…!

लोकपत डिजिटल मीडिया /  अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी  सोमनाथ घार्गे

 

यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनला दिनांक 05/06/2025 रोजी 18.00 पासून दिनांक 06/06/2025 रोजी 02.00 वा. या कालावधीमध्ये ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आदेश दिले. यादरम्यान गोवंश जनावरांचे कत्तल / प्राणी संरक्षण कायदयांतर्गत केसेस, कत्तलखाने चेकींग, रेकॉर्डवरील सराईत आरोपी चेंकीग, गोवंश जनावरांची कत्तलींबाबत दाखल गुन्हयांतल्या सराईत आरोपींची चेंकीग करणेबाबत सुचना आणि आदेश दिलेले होते.

या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर असे एकूण 32 पोलीस अधिकारी आणि 250 पोलीस अंमलदार यांच्याकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

प्राणी संरक्षण कायदयान्वये दाखल केसेस (गोवंश जनावरे) 13 केसेस जप्त मुद्देमाल एकूण 37,03,000/- रुपये किं. त्यात 79 गोवंश जातीचे जनावरे, गोवंश जनावरांची कत्तल करणारे सराईत आरोपी चेंकींग 64, कत्तलखाने चेकींग 32, सराईत आरोपी चेकींग 113, चेक पोस्ट चेकींग 23.

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर आणि वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी