लोकपत न्युज नेटवर्क / पुणे / प्रतिनिधी
एकीकडे बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अमानवी अत्याचार होत असताना पुण्यासारख्या सुसंस्कृत भागात बांगलादेशी रोहिंग्याने हक्काचं घर बांधलं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी संबंधित बांगलादेशी रोहिंग्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सविस्तर वाचा आणि नक्की जाणून घ्या, काय आहे प्रकार.
मुजम्मिल मोहम्मद अमीन खान असं पुण्यातल्या देहू रोड परिसरात घर बांधलेल्या बांगलादेशी रोहिंग्याचं नाव आहे. विशेष म्हणजे खान याने पाचशे रुपये देऊन कुठल्याही कागदपत्राशिवाय स्वतःचं आणि पत्नीचं आधारकार्ड तयार करुन घेतलं असल्याची माहितीदेखील पोलीस तपासात समोर आली आहे.
खान हा पूर्वी म्यानमार मध्ये राहत होता. मात्र उद्योग व्यवसायासाठी तो बांगलादेशात गेला होता. पुण्याच्या देहू रोड परिसरात असलेल्या चंद्रभागा कांबळे यांच्या घराला लागून मोकळी जागा खान याने विकत घेतली आणि तिथे घर बांधलं. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी खानविरुद्ध गुन्हा दाखल केला.