Thursday, January 23, 2025

बीडचे तत्कालीन पालकमंत्री मुंडेंच्या शिफारशीवरूनच वाल्मीक कराड ‘त्या’ पदावर…! महाराष्ट्राच्या जनतेत पसरलीय प्रचंड संतापाची लाट…!

लोकपत न्यूज नेटवर्क / बीड / प्रतिनिधी 

वाल्मीक कराडविरुद्ध 14 गुन्हे दाखल असतानादेखील त्याला परळीतल्या लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्षपदी नेमण्याचा प्रताप करण्यात आला आहे. सीआयडीच्या तपासात नुकतंच हे संतापजनक वास्तव समोर आलं आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीच कराडची शिफारस केल्याचंदेखील समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. 

कराड हा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. त्याच कारणाने संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास सुरू आहे. असं असताना धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळात ठेवू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे, कराडभोवती कारवाईचा फास घट्ट आवळला जात आहे. पवनचक्कीच्या कंपनीचे जे अधिकारी आहेत, त्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा कराडविरुद्ध आरोप आहे.

तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात समिती तयार करण्यात आली. परळी तालुक्यात जी समिती कार्यरत होती, त्या समितीच्या अध्यक्षपदी वाल्मीक कराड याची नियुक्ती करण्यात आली होती. दोन अशासकीय सदस्यांसह काही अधिकारी आणि कर्मचारीदेखील या समितीचे सदस्य आहेत. 

दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या कारवाईला आता वेग आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातला कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी फरार आहे. वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वाल्मीक कराडभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी