बीड जिल्ह्याचे एसपी अविनाश बारगळ यांची उसळ बांगडी झाल्यानंतर त्यांच्या जागी नवे एसपी नवनीत कॉवत हे आले आहेत. बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीला आळा घालण्याचं आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रचंड मोठ असं आवाहन एसपी कॉवत यांच्यासमोर आहे. हे आव्हान ते पेलणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख
यांची हत्या झाल्यानंतर बीडसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्याकांडाची गंभीर दखल घेत बीडचे एसपी अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले होते.
एसपी बारगळ यांच्या बदलीनंतर बीड जिल्ह्याला आता कॉवत हे नवे एसपी म्हणून लाभले आहेत. एसपी कॉवत हे शांत स्वभावाचे आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम असणारे सन 2017 च्या बॅटचे अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपयुक्तपदी ते कार्यरत होते. बीडच्या खंडणीच्या प्रकाराची ते गंभीर दखल घेणार आहेत.
दरम्यान, जेष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील मस्साजोग इथं जाऊन मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. देशमुख कुटुंब एकटण असून आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. त्याच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेत आहोत, अशी घोषणा पवार यांनी यावेळी बोलताना केली.