Thursday, January 23, 2025

बीडचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईल?

लोकपत न्यूज नेटवर्क / बीड / प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे तरुण, तडफदार सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हेच असल्याचं मयत सरपंच देशमुख यांच्या भावानं मिडियाशी बोलताना स्पष्टपणे सांगितलंय. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी यामध्ये सरपंच संतोष देशमुख

यांचे जे मारेकरी आहेत, त्यांना आगामी काळात जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होईल का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या छोट्याशा गावात वेगवेगळ्या जाती आणि धर्माची माणसं गुण्यागोविंदानं राहत आहेत. मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांमुळे या गावातली शांतता नाहीशी झाली. गावातल्या सर्वच समाज घटकांच्या सुखदुःखात सातत्यानं पुढाकार घेणारे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर आलं आहे.

मयत सरपंच संतोष देशमुख यांची पत्नी, आई, भाऊ आणि लहान लहान मुलांच्या जिविताचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याच्या प्रमुखांना

या कुटुंबाला संरक्षण द्यावंच लागणार आहे. किंबहुना तशी मागणीदेखील या कुटुंबाकडून केली जात आहे. मयत सरपंच देशमुख यांच्या हत्येमागे मराठाविरुद्ध अन्य समाजाचा संघर्ष अशी किनार नाही ना, याचादेखील तपास पोलीस यंत्रणेला करावा लागणार आहे.

या गावात उभारण्यात आलेल्या पवनचक्कीच्या राष्ट्रीय प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून त्रास झाल्याचं मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावानं सांगितलं आहे. यामध्ये नक्की कोणाकोणाचा सहभाग होता, याविषयी मयत सरपंच देशमुख यांच्या भावाला कुठलीही कल्पना नसली तरी हे आता पोलिसांना शोधून काढावंच लागणार आहे.

बीडचा बिहार करणारे नक्की कोण?
जातीय दंगली, खंडणीसाठी अपहरण, खून अशा घटना महाराष्ट्रात फार तुरळक प्रमाणात घडत असतात. या घटनांसाठी बिहार हे राज्य प्रसिद्ध आहे. कारण बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, हाच मोठा प्रश्न मध्यंतरी उपस्थित झाला होता. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यानंतर महाराष्ट्राचा बिहार झाला, असं म्हटलं जायचं. दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात अशी घटना घडली असल्यामुळे बीडचा बिहार झालाय, असं या निमित्तानं बोलले जाते. मात्र बीडचा बिहार करणारे नक्की कोण आहेत, त्यांना कोणाचा वरदहस्त आहे, नक्की कोणता लफडेबाज आणि जातीयवादी पुढारी यासाठी खतपाणी घालतो आहे, याचा बारकाईने शोध घेऊन मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्याकांडात सहभागी असलेल्या प्रत्येकाचं ‘कनेक्शन’ शोधून काढण्याचं आणि सर्वच आरोपींसह या आरोपींच्या म्होरक्याला ‘एक्सपोज’ करण्याची मोठी जबाबदारी बीडच्या पोलिसांवर येऊन ठेपली आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी