Saturday, April 26, 2025

‘भगवा’ जिसे पसंद नहीं, ‘वो’ ‘भडवा’ कौन? अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांच्या फलकांची विटंबना…! महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला निषेध…! कारवाईची केली मागणी…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातल्या वाडियापार्क परिसरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु आहेत. आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा सुरु असून या स्पर्धेला अहिल्यानगर शहरातल्या सर्वच क्षेत्रांतल्या कुस्तीप्रेमी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आणि सहकार्य मिळत आहे. मात्र हिंदुत्वाच्या विरोधात सातत्यानं गरळ ओकत असलेल्या नीच प्रवृत्तीच्या अज्ञात समाजकंटकांनी या स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या स्पर्धेचा समारोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतार्थ महापौर संग्राम जगताप

यांच्या मार्गदर्शनाखाली फ्लेक्स लावण्यात आले आहेत. 

अहिल्यानगर महापालिका कार्यालयासमोर मुकुंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्यालगत हे फलक लावण्यात आले असता काही समाजकंटकांनी ते फाडले आणि त्या फलकांवर गुटखा खाऊन थुंकण्याचा नालायकपणा केला. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा घाणेरडा प्रकार आज (दि. ३१) आला. घटनास्थळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत या घाणेरड्या प्रकाराचा निषेध नोंदवला आणि संबंधित समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

हा प्रकार सहन आम्ही करणार नाही : तुषार पोटे यांचा इशारा

आमदार संग्राम जगताप यांनी आयोजित केलेल्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमुळे अहिल्यानगरमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह अनेक नेतेमंडळी अहिल्यानगरमध्ये येणार आहेत. या नेतेमंडळींच्या स्वागतासाठी हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. मात्र जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांना हे सहन झालं नाही. असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. संबंधित समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. यापुढे आम्ही असला प्रकार सहन करणार नाही, असा इशारा तुषार पोटे यांनी दिलाय. 

 या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आलं. भाजपचे माजी शहराध्यक्ष महेंद्र गंधे, तुषार पोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार वाकळे, अजिंक्य बोरकर, निलेश बांगरे, वैभव ढाकणे, अमित घटणे, दिनेश जोशी, योगेश ठुबे, ओंकार देशमुख, ओंकार घोलप, ओंकार देशमुख, किरण गुंजाळ, मयूर मैड, अजय शिंदे, विजय सुंबे, गणेश गोरे, अशोक चोभे, भागवत कुरधरने, सागर डोंगरे, सचिन पवार, भाऊ पुंड, योगेश खताळ, दादा पांडुळे, मनीष फुलडहाळे, वैभव दळवी, संतोष फुलारे, चेतन लखापती, गौरव कचरे आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी