लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या भारत बबन पुंड (संस्थापक अध्यक्ष भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट) याला अहिल्यानगर एमआयडीसी पोलिसांनी परवा अटक (दि. १) केली. पुंड याला नगरच्या कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने त्याची सोमवारपर्यंत (दि. 9 डिसेंबर) पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
साडेतीनशे पेक्षा जास्त ठेवीदारांच्या 50 कोटी रुपयांच्या ठेवी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अडकलेल्या आहेत. यासंदर्भात ठेवीदारांनी अनेकवेळा पोलीस यंत्रणेकडे पाठपुरावा केला. दरम्यान, संतप्त झालेल्या शेकडो ठेवीदारांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर किया आंदोलन करण्याचा निर्धार केला. तसं निवेदनदेखील पोलिसांना देण्यात आलं.
अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी ठिकाणांची भेट घेऊन त्यांना तपासासाठी काही दिवसांची मुदत मागितली. सुदैवानं एमआयडीसी पोलिसांना भारत पुणे याला अटक करण्यात यश आलं. दिनांक 9 डिसेंबर पर्यंत पुंड याला पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पुंड याच्या अटकेमुळे ‘चांडाळ चौकडीं’चे धाबे दणाणले…!
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करत आहेत. पुंड याला या आर्थिक घोटाळ्यामध्ये कोणाकोणाचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलं आहे, पुंड याने कोट्यवधी रुपयाचे ठेवींचं नक्की काय केलं आहे आणि ठेवीदारांच्या या ठेवी संबंधितांना परत देण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यावर खरं तर एमआयडीसी पोलीस आता काम करत आहेत. विशेष बाब ही आहे, की सपोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुंड याला अटक करण्यात आल्यामुळे त्याचे साथीदार आणि त्याला प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणाऱ्या ‘चांडाळ चौकडीं’चे चांगलेच धाबे दणाणले आहेत.