लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे
यांच्या मौलिक सहकार्यामुळे या मतदारसंघातल्या घोडेगावचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटला आहे. याचं कारण म्हणजे घोडेगावसाठी मुळा धरणातून ०. ७२५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आलंय. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा
आणि त्यांचे बंधू सरपंच राजेंद्र देसरडा यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला घवघवीत यश आलं आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आणि जलजीवन मिशन या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत घोडेगावमध्ये तब्बल 49 कोटी रुपये खर्च करुन पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम सध्या बऱ्यापैकी गतिमान करण्यात आलं आहे. आगामी सन 2053 घोडेगावची लोकसंख्या विचारात घेऊन मुळा धरणातून घोडेगावच्या या योजनेसाठी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेतून घोडेगावच्या 14 हजार लोकवस्ती असलेल्या या परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यात आला आहे. यासाठी घोडेगावमध्ये पाच ठिकाणी पाण्याच्या उंच संतुलित टाक्या बांधण्यात येत आहेत. मुख्य पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता पाच लाख पंधरा हजार लिटर आहे. मोहिते वस्ती, घोडेश्वरी देवी परिसर आणि कदम वस्ती याठिकाणी हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. घोडेगावच्या ग्रामस्थांमधून याबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे.