Thursday, January 23, 2025

भाजपचे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन…!

लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

1995 ते 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असलेले आदिवासी विकास मंत्री, दुग्धविकास मंत्री, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री अशा विविध पदांवर काम केलेल्या भाजपचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं वृद्धापकाळानं निधन झालं.  ते 84 वर्षांचे होते. 

आज (दि. ६) सकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. बेन स्ट्रोक झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून पिचड हे पवारांच्या सोबत कार्यरत होते. राजकीय कारकीर्दीपासूनच पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. 

मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षपदीदेखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2014 मध्ये त्यांनी मुलगा वैभव यांना अकोले मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उभे केलं आणि राजकीय वारसदार म्हणून विजयीदेखील केलं. दरम्यान, मधुकरराव पिचड यांच्या निधनामळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी