लोकपत न्यूज नेटवर्क / नागपूर / प्रतिनिधी
मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा अखेर आज (दि. १५) पार पडला. नागपूरच्या विधीमंडळात भाजपच्या 16, शिवसेनेच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी राज्यमंत्री पदाची पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला.
आतापर्यंत महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना शपथ दिली आहे.
नागपूरच्या राजभवनामध्ये राज्य मंत्रीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला लवकर सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची स्थापना करणं आवश्यक होतं. भाजप 19, शिवसेना 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
मंत्रीपदाची जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं नक्कीच सोनं करु. राज्याला विकासाकडे कसे नेत्यांनी या दृष्टीने प्रयत्न करु, अशी ग्वाही नवनियुक्त मंत्र्यांनी यावेळी बोलताना दिलीय. दरम्यान, नागपूरच्या रामगिरी बंगल्यामध्ये महायुतीची लवकरच पत्रकार परिषद होणार आहे.