लोकपत डिजिटल मीडिया / नवीदिल्ली / वृत्तसंस्था
भारतापेक्षा पाकिस्तानची लष्करी क्षमता कमी आहे. खरं तर पाकिस्तान आणि भारताची तुलना होऊ शकत नाही. पण जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर २ ते ३ आठवड्यांच्या युद्धामुळे पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो, असं तज्ज्ञांचे मत आहे. १९७१ च्या युद्धात, जेव्हा भारताने पूर्व आणि पश्चिम दोन्ही आघाड्यांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने १३ दिवसांत शरणागती पत्करली आणि त्याचे दोन तुकडे झाले. जर आपण सध्याच्या काळाबद्दल बोललो तर, पाकिस्तानला १३ दिवस ही थेट लढाई लढणे कठीण वाटते.
दरम्यान, अटारी सीमा बंद झाल्याने भारत-पाकिस्तानमधील उरलेसुरले व्यापार व्यवहारही बंद झाले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर २०१९ पासून या व्यापारात मोठी घट झाली होती. सध्या भारताच्या एकूण व्यापारात पाकिस्तानचा वाटा केवळ ०.०६ टक्के आहे, असे भारतीय निर्यात संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष एस. सी. रल्हान यांनी सांगितलंय.
या व्यापारात प्रामुख्याने फळे, सुका मेवा, तेलबिया व वनस्पतींचा समावेश होता. पाकिस्तान भारतातून औषधे, रसायने, कापूस, कांदे, टोमॅटो, चहा आणि कॉफी मोठ्या प्रमाणावर आयात करत होता. आता हे सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत. अटारीमार्गे अफगाणिस्तानशी होणाऱ्या व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताच्या या ठोस आणि निर्णायक भूमिकेमुळे दोन्ही देशांतले तणाव अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.