Monday, April 28, 2025

भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार…! जुने अभिलेखे जतन करण्याची तात्काळ कार्यवाही करा : दिपक पाचपुते यांची मागणी…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातली महत्वाची कागदपत्रं गहाळ होत आहेत. अहिल्यानगरच्या भूमी अभिलेख कार्यालयातली महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाली असताना त्याची जबाबदारी निश्चित असलेल्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. याच्याशी माझा काही संबंध नाही, मी त्यावेळी नव्हतो, अशी बेजबाबदार उत्तरं  अहिल्यानगरच्या भूमी अभिलेख कार्यालयाचे अविनाश मिसाळ हे देत आहेत.  यामुळे नागरिकांसह प्रशासनाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे जीर्ण झालेले दस्तऐवज स्कॅन करून ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 
 जीर्ण अवस्थेतले दस्तऐवज स्कॅनिंगने सुरक्षीत ठेवणार असल्याने नागरिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातल्या जिर्ण अवस्थेत असलेले  दस्तऐवज हळूहळू गहाळ होत आहेत. त्यामुळे जीर्ण अवस्थेतील दस्तऐवज स्कॅन करून जतन ठेवण्याची मागणी सामाजिक  तथा माहिती अधिकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी प्रशासनाकडे केली आहे. 
अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाची कागदपत्रे गहाळ होत असून त्याची जबाबदारी निश्चित असलेल्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणती ही दखल होत नाही, यामुळे अशा कारणास्तव प्रशासकीय पारदर्शक कारभारासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जुन्या महत्वाच्या महसूली अभिलेखाचे स्कॅनिंग करून शासन निर्णय, परिपत्रकाप्रमाणे महत्वाचे अभिलेखे जतन करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात यावीत. दरम्यान, यामुळे जीर्ण अवस्थेतील दस्तऐवजदेखील सुरक्षित राहणार आहेत.
शासकीय अभिलेख गहाळ झाल्यास शासकिय कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे ही मागणी केलेली असून त्यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने सर्व कार्यालयाने लवकरात लवकर आदेश द्यावेत, अशी अपेक्षा दीपक पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.
Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी