लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी अवघ्या सातवी उत्तीर्ण झालेल्या आई-वडिलांकडून जन्मजात ‘बाळ कडू’ ज्यांना मिळालं, यासाठी महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला, ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून ज्यांनी गोरगरिबांच्या समस्यांना वाचा फोडली, असे महाराष्ट्र निर्भय पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्याशी लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत यूट्यूब चॅनलनं आज (दि. ११) संवाद साधला.
जितेंद्र भावे यांच्या स्वभावाचं आणि कार्याचं वर्णन करायचं ठरलं तर भ्रष्टांच्या कानाखाली आवाज काढणारा कार्यकर्ता, बेकायदा सावकारांचा कर्दनकाळ असंच करावं लागेल. जितेंद्र भावे यांच्याशी ‘लोकपत’ची झालेली ‘ग्रेट भेट’ तुम्ही नक्की पहा.